0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
स्वीडनचे राजे कार्ल व राणी सिल्विया यांनी कफ परेड येथील डोअर स्टेप शाळेला भेट देऊन शाळेतील मुलांसोबत संवाद साधला. शाळाबाह्य  मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी डोअर स्टेप शाळेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात.          
चालती फिरती शाळा’ म्हणून शाळेच्या बसमध्ये क्लासरूमची सुविधा उपलब्ध असून मुलांना या बसमध्येदेखील शिक्षण दिले जाते. ज्या ठिकाणी शाळाबाह्य मुले असतात, तिथे ही बस जाऊन थांबते आणि जी मुले शाळेत जात नाहीत, त्या मुलांना शिकविले जाते. त्यामुळे मुलांना शाळेची आवड निर्माण होऊन मुले शाळेत जायला सुरुवात करतात. अशा प्रकारचा अभिनव उपक्रम या शाळेच्या वतीने राबविण्यात येतो. या उपक्रमामुळे शाळाबाह्य मुलांना शिक्षण मिळते आणि साक्षरतेचे प्रमाण वाढण्यास मदत होते, अशी माहिती डोअर स्टेप शाळेच्या संचालिक बिना शेठ लष्करी यांनी दिली.

Post a comment

 
Top