0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली  |
देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर आजपासून फास्टॅग योजना लागू केली जात आहे. या योजनेमुळे टोलनाक्यांतून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस व होऊ शकले. मात्र वाहनांवर फास्टॅग नसेल आणि तरीही फास्टॅगच्या मार्गिकेतून जाणाऱ्या वाहन चालकांना दुप्पट टोल भरावा लागेल.
केंद्र सरकारने 15 डिसेंबरपासून फास्टॅगच्या माध्यमातून टोल कराचे संकलन अनिवार्य केले आहे. यासाठी टोल ऑन फास्टॅगची डिलिव्हरी विनाशुल्क केली जात आहे. यानंतर कोणीही त्यांच्या गाडीमध्ये हा फास्टॅग न लावल्यास त्यांना टोलच्या दुप्पट पैसे द्यावे लागतील. फास्टॅगचे संचालन नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) करते. खरेदीनंतर फास्टॅगची वैधता 5 वर्षांपर्यंत आहे. आपल्याला या कालावधीपर्यंत त्याचे पुनर्भरण करावे लागेल. नेटबँकिंग, क्रेडिट / डेबिट कार्ड, यूपीआय आणि इतर मार्गांद्वारे फास्टॅगचे रिचार्ज देखील केले जाऊ शकते.फास्टॅग हा एक रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग आहे. जो वाहनाच्या विंडशील्डवर बसविला गेला आहे. जेणेकरुन जेव्हा वाहन टोल प्लाझा पार करते. तेव्हा प्लाझावरील सेन्सर फास्टॅग वाचू शकेल. तेथे स्थापित उपकरणे स्वयंचलितपणे टोल कर संकलित करतात. यामुळे वाहनचालकांचा वेळ वाचतो. एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार, फास्टॅगच्या माध्यमातून सध्या देशातील 537 टोल प्लाझावर टोल कर वसूल केला जात आहे.

Post a Comment

 
Top