BY -
युवा महाराष्ट्र लाइव – नांदेड |
नांदेड जिल्हयातील बी.पी.एड. व बी.एड. तसेच डी.एड. अंशकालीन पदविधरांना
यवतमाळ जिल्हा परिषदेप्रमाणे नांदेड जिल्हा परिषदेने नियूक्ती करावी अशी मागणी पदविधर
अंशकालीन कर्मचारी संघटनेचे जिल्हयाध्यक्ष गौतम देवकरे यांच्यासह इतर पदाधिका·यांनी
मुख्य कार्यकारी अधिकारी नादेड यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र शासनाने 17 जुन 2019
रोजी पदविधर अंशकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणून देण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हा
परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका·यांना देवून
ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या आदेशाला गांभीर्याने बघत नाहीत. परंतू यवतमाळ जिल्हा परिषदेने 20 सप्टेंबर 2019
रोजी यवतमाळ जिल्हयातील अनेक बी.पी.एड.,बी.एड. व डी.एड. पदविधर अंशकालीन कर्मचा·यांना
शिक्षणसेवक म्हणून नियूक्ती दिल्या आहेत
नांदेड जिल्हयात जवळपास शिक्षकांच्या अंदाजित चारशे ते साडेचारशे जागा रिक्त असतांनाही
ही पदे का भरण्यात येत नाहीत असा सवाल पदविधर अंशकालीन कर्मचाऱ्यांतुन होत आहे. पदविधर
अंशकालीन या संघटनेने अनेकदा प्रशासनास निवेदने
दिले धरणे आंदोलन केले तरी ही प्रशासन मात्र
या कर्मचा·यांच्या मागणीला केराची टोपली दाखवत आहेत. यामुळे 3 डिसेंबर 2019 रोजी पदविधर
अंशकालीन कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौतम देवकरे, जिल्हा उपाध्यक्ष एस.एन.देशमुख,
कोषाध्यक्ष पंडीत हंबर्डे, जिल्हा सचिव देविदास कांबळे, गणपत इंगळे, कल्याण दरेगावे,
श्रीकृष्ण वरदे, इरपे के.एन. यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदण देउण मागणी केली . जर ही मागणी मान्य न झाल्यास 16 डिसेंबर 2019 रोजी
पासुन जिल्हा. परिषदेसमोर आमरण उपोषण करण्यात
इशारा दिला असुन उपोषनाचा दुसरा दिवस चालु
आहे.
Post a comment