0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – अहमदनगर |
मुलींवर होणार्‍या अत्याचाराच्या घटना दिवसंदिवस वाढत असून, पंधरा दिवसापुर्वी अकोला जिल्ह्यातील मरोडा (ता. अकोट) गावात मातंग समाजातील मुलीवर चार गाव गुंडांनी सामुदायिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील एकाही आरोपींना अद्यापि अटक झालेली नसून, या घटनेचा निषेध नोंदवत त्वरीत आरोपींना अटक करुन फाशी देण्याची मागणी लहुजी शक्ती सेना व सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली. 
अकोला जिल्ह्यातील मरोडा (ता. अकोट) गावात एका युवतीवर चार गाव गुंडांनी सामुदायिक बलात्कार करुन तीला तीच्याच घरी फासावर लटकविण्यात आले. ही घटना दि.14 डिसेंबर रोजी घडली असून, यामधील आरोपी अजूनही मोकाटच आहे. मानवतेला काळिमा फासणारी ही घटना घडली असून, या घटनेचा खटला जलदगती कोर्टात चालवून आरोपींना फाशी द्यावी, तत्पुर्वी आरोपींना अटक करावे, आरोपींना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलीसांना देखील सहआरोपी करण्याची संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. या घटनेचा भारतीय लहुजी सेना, अण्णाभाऊ साठे युवक संघटनेने देखील निषेध नोंदविला आहे. या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार (गृह) राजेंद्र दिवाण यांना देण्यात आले. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे कार्याध्यक्ष सुनिल सकट, भारतीय लहुजी सेनेचे संपर्क प्रमुख तथा अण्णाभाऊ साठे युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव काते, आकाश शिंदे, विकास शिंदे, शरद खंडागळे, मार्कस खंडागळे, विशाल शिंदे आदी उपस्थित होते. या प्रकरणातील आरोपींना अटक न झाल्यास सपुर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

Post a comment

 
Top