0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड शहरापासून चार ते पाच किलोमीटर वरील फणसोली तळ्याची वाडी येथील तरुणावर बिबट्याने आज सकाळी हल्ला केल्याने या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला असून उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
      या बाबत सविस्तर वृत्त असे की,शेतात लावलेल्या काकडीला पाणी भरण्यासाठी गेलेल्या अशोक हरी बरतड (२२) या तरुणावर बिबट्याने हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी झाडावर चढताना बिबट्या ने पंजा मारला व त्यात तो जखमी झाला.त्याच्या किंचाळीमुळे बाजूच्या शेतातील माणसे धावल्याने बिबट्याने पलायन केले. मात्र या परिसरात बिबट्याने शेतकऱ्यावरच हल्ला करून दहशत निर्माण केली आहे. अशोक यास तातडीने उपचारासाठी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याला उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे सांगण्यात आले 

Post a comment

 
Top