0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
देशात बलात्काराच्या आणि महिला अत्याचाराच्या घटनेत सतत वाढ होत आहे. महाराष्ट्र पण काही वेगळा नाही. महाराष्ट्र राज्यात महिलां सुरक्षित नाही. ऐवढे असतांना सुध्दा निर्भया फंड चा उपयोग करण्यात आला नाही.ही लाजीरवानी बाब आहे. निर्भया फंड चा उपयोग महिलांना सक्षम बनवण्यासाठी करण्यात यावा.शाळा आणि महाविद्यालयात मुलींसाठी कराटे आणि शस्त्रास्त्रे प्रशिक्षण सूरू करण्यात यावे. ह्या प्रशिक्षणासाठी निर्भया फंड चा उपयोग करण्यात यावा.
मुली आणि महिलांना जीवंत जाळण्यात येत आहे.ही शोकांतिका आहे.हया सर्व प्रकारावरती उपाय योजना करणे गरजेचे आहे.महिलांनवरती होणार्या अत्याचाराला थांबवायचे असेल तर महिलांना सक्षम बनविणे अतिशय महत्त्वाचे आहे.पोलीस प्रत्येक ठिकाणी जाऊन महिलांची सुरक्षा करू शकत नाही.स्त्रियांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत बनविणे अतिशय महत्त्वाचे आहे. संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रमध्ये मुलींना मोफत कराटे आणि शस्त्रास्त्रे प्रशिक्षण देण्यात यावे. असे निवेदन देण्यात आल्याची माहिती समाजसेविका पुजा डकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Post a Comment

 
Top