0
BY - दिपाली दळवी,युवा महाराष्ट्र लाइव – मंत्रालय,मुंबई |
आमच्या युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीच्या माध्यमातून फडणवीस सरकार असताना त्यांच्या आमदार,खासदारांच्या शिफारसीने खुर्चिवर बसविलेल्या अधिकार्‍यांची तात्काळ बदली करण्याची मागणी केली होती यामध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा संशय असून मनमानी पध्दतीला थांबवून माझ्या विभागात माझ्या शिफारसीच्या अधिकार्‍यांची बदली प्रकाराची दखल घ्यावयाची मांगणी समाजसेविका सौ.ज्योतीतार्इ नामदेव शेलार यांनी राज्याचे पारदर्शक मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचेकडे काही दिवसांपुर्वी केली होती त्या वृत्ताची अखेर दखल मुख्यमंञ्यांनी घेतली.

            काही दिवसांपुर्वी आमच्या बातमीचे वृत्त मोठया प्रमाणात व्हायरल झाले.जनतेसमोर समाजसेविका सौ.ज्योतीतार्इ नामदेव शेलार यांनी हा प्रकार कसा घडत आहे हे दाखवून दिले.याच विषयाची दखल घेत ठाकरे सरकारने हा पारदर्शक व नायक भुमिकेचा निर्णय घेतल्याचे पुन्हा एकदा सिध्द केले आहे.ज्योतीतार्इ शेलार यांच्या मागणीची गंभीर विषयक म्हणून दखल घेतली आणि मुख्यमंत्री यांनी देवेंद्र फडणवीस यांचे काळातील अधिकार्‍यांच्या बदलीचे सत्र सुरू आहे.याची सुरूवात आय.ए.एस.चे तीन अधिकारी यांच्या बदलीने  केली आहे.त्यांच्या या धडाडी कार्याला समाजसेविका सौ.ज्योतीतार्इ नामदेव शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

Post a comment

 
Top