0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मुंबई मेट्रो रेल कॉर्पेरेशनकडून केराची टोपली दाखवण्यात आली असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. आरेतील या परिसरात दिवसरात्र खणण्याचे काम सुरूच असल्याचे वृत्त आहे. प्रजापूर पाडा येथे रॅम्प बनवण्याच्या कामाने दिवसा आणि रात्रीही वेग घेतला आहे. सातत्याने जमिनीच्या पोटात यंत्र शिरण्याचा आवाज येत असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात आला आहे.

Post a Comment

 
Top