0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – डोंबिवली |
मुंबई लोकलच्या गर्दीने आणखी एका प्रवाशाचा जीव घेतला आहे. भरगच्च लोकलमधून पडल्याने एका 22 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.चार्मी पासद असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान आज सकाळी 9 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
चार्मी पासदने डोंबिवलीवरुन सकाळी 8.53 ची लोकल पकडली होती. मात्र गर्दीमुळे आत जाता न आल्यामुळे, ती बाहेरच लटकून राहिली. ट्रेन डोंबवलीच्या पुढे गेल्यानंतर, डोंबिवली आणि कोपर रेल्वेस्थानकादरम्यान, चार्मीचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. या दुर्घटनेमध्ये तिचा अंत झाला.

Post a Comment

 
Top