0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – कोल्हापूर |
सौ.सविता सुरेश डाळे-पाटील यांच्या व्ही.पी.आर. प्रॉडक्शन आणि महेश्वर तेटांबे यांच्या आर्यारवी एंटरटेनमेंट अंतर्गत निर्मिती केलेला अनंत सुतार लिखित आणि दिग्दर्शित सोशल मिडीयावर आधारीत सामजिक हिंदी लघू चित्रपट "गुमसूम" या लघुपटाला NexGen International Short Film Festival मध्ये AWARD OF EXCELLENCE FOR BEST SHORT FILM  हा पुरस्कार  दिनांक १६ डिसेंबर रोजी दुपारी २:०० वाजता मानस हॉटेल , इचलकरंजी , कोल्हापूर येथे टॉलिवूडचे सुप्रसिद्ध खलनायक कलाकार (हिंदी सिनेमा बाहुबली , KGF , Sriman Narayan फेम) अनंत कोला  यांच्या हस्ते प्रदान करण्यांत आला. या प्रसंगी नेक्स्जन संस्थेचे संस्थापक , आयोजक सूरज साळुंखे, डायरेक्टर रवीना सिंग, ऋषी सिंग, ज्युरी स्नेहा शिंदे, स्नेहा तोत्रे, गणेश ठाकूर, दौलत जाधव , अभिनेता सुरेश डाळे-पाटील, लेखक -दिग्दर्शक अनंत सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. या आंतरराष्ट्रीय लघू चित्रपट फेस्टिवल मध्ये भारतातून तसेच भारताच्या बाहेरून देखील जास्त आणि विविध भाषिकांमधील लघू चित्रपटांनी सहभाग घेतला होता.एकंदरीत हा नेक्स्जन आंतरराष्ट्रीय फेस्टिवल सोहळा पहिला वाहीला असून देखील नेक्स्जन संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या उत्साही वातावरणात कौतुकास्पद झाला

Post a comment

 
Top