0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
सत्ता बदलली की नेत्याचा पक्ष बदलतो हे आपण पाहिलेच असेल,जो एकनिष्ठ तोच खरा कार्यकर्ता असेच म्हणता येईल.परंतु मुरबाड मध्ये तो तेव्हा ही मनसेचा होता आणि आज उद्याही मनसेचाच राहाणार त्यामुळे त्याची ओळखच मनसे नावाची बनली आहे.मुरबाड मधील देवीची आळी येथील अत्यंत गरिब घरात जन्म झालेल्या व प्रामाणिकपणे मेहनत करुन हजारो नागरिकांच्या मनात त्याच्या नावाची ओळख नसून मनसे नावाची ओळख असणार्‍या समाधान कोथिंबीरे यांची आपण चर्चा करित आहोत.अत्यंत कुशल परंतु आर्थिक दृष्टी कमकुवत आपल्या जिवनात आनंदाचे जीवन जगत आहे.प्रत्येक नागरिकांना मदत करणारा समाधान नागरिकांची सेवा करत त्यांना समाधान प्राप्त करुन देत आहे.अशा समाधानाला एक ओळख मिळाली ती म्हणजे मनसे ची.जेव्हा मनसेची स्थापना झाली तेव्हाच जगेल किंवा मरेल या अस्मितेत महाराष्ट्राचा मनसे सैनिक म्हणून. कित्येक वर्षापासून आजही समाधान मनसे कार्यकर्ता म्हणून एकनिष्ठ राहिला आहे.
ज्येष्ठ असो वा लहान त्यांना आदराने सन्मानाने मनसे कार्य करत आला आहे.स्वःखर्चाने मदतीचा हात देणारा मनसे (समाधान कोथिंबरे) आज प्रत्येकांच्या मनात घर करून बसला आहे.याच समाधानाची एक इच्छा मात्र तशीच राहिली आहे ती म्हणजे एकनिष्ठ राहिलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख मा.राजसाहेब ठाकरे यांची भेट.मुरबाडमध्ये मनसे हा व्यक्तीच्या नावातच फेमस असून मनसे कार्यकर्ता म्हणून ओळखीचा बनला आहे.असा कोणता व्यक्ती नाही कि ज्याच्या मुखातून मनसे असा आवाज येत नाही.या मनसे अर्थात समाधानाला आजही मा.राजसाहेब ठाकरे यांची भेट होर्इल अशी आशा आणि समाधान मनातच राहिले आहे.

Post a comment

 
Top