0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – उल्हासनगर |
दिनांक 8 डिसेंबर 2019 रोजी तुते गाव शहापूर या ठिकाणी उल्हासनगर मध्ये असलेलं स्वामी हंसमुनी महाराज डिग्री कॉलेज उल्हासनगर-4च्या NSS यूनिट चे 7 दिवसाचे विशेष  निवासी शिबीर सुरु आहे. या शिबिरामध्ये विध्यार्थी सहभाग घेऊन विविध उपक्रम राबवत असतात.गावामध्ये श्रमदान केले जाते.
विध्यार्थ्यांना गटाचे महत्व  समजले पाहिजे म्हणून  झेप बहुउद्देशी सामाजिक संस्था संलग्न ध्यास समुदाय विकास संस्था यांच्या मार्फत विद्यार्थ्यांसाठी गटबंधणी कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेत विध्यार्थ्यांना गट म्हणजे  काय गटाचे महत्व काय हि माहिती विविध खेळातून देण्यात आली.
सदर कार्यशाळा घेण्यासाठी श्री.विकास भालेराव, श्री.विजय बाविस्कर,श्री.राजेश पेठारे,सौ.कविता निकम,व कु.रोशनी आहिरे, मान्यवर उल्हासनगर वरून तुते गावी आले होते.SHM कॉलेजच्या प्रिन्सिपल  श्रीम.दीप्ती मिश्रा NSS कार्यक्रम अधिकारी श्री.निनाद कसले सर आणि श्रीम.प्रियांका भामबेरे मॅडम यांनी यासर्व शिबिराचे 7 दिवसाचे नियोजन केलेलं आहे.

Post a Comment

 
Top