0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – जालना | 

जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील दुधपुरी येथील शेततळ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडली. दुधपुरी येथील सिद्धेश्वर रामकिसन धांडे वय 16 वर्षे व शुभम कल्याण पाटोळे 14 वर्षे हे दोघे काल सायंकाळच्या सुमारास शेततळ्यात गेले असल्याची प्राथमिक माहीती मिळाली. ते दोघे राञी उशीरापर्यत घरी न आल्याने त्यांच्या कुंटूंबीयांनी शोधाशोध केली परंतु ते दोघे सापडले आले नाही. शेवटी आज सकाळी त्या दोघाचेही मृतदेह शेततळ्यात तरंगतांना आढळुन आल्यानं ही घटना उघडकीस आली.

Post a comment

 
Top