0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – कर्जत |
कर्जत तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या विविध रस्त्यांची  झालेली दुरावस्था पाहता एकही रस्ता चांगला अवस्थेत नाही परंतु निकृष्ट दर्जाचे रस्ते,त्यातच खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे.कर्जत सा.बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या आशिर्वादाने   ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार करून त्यांना लाखोंची बिले अदा केली असून त्यांच्यावरील मलिदा  (टक्केवारी ) घेण्यासाठी  पटाईत आहे.जणु ठेकेदार हेच त्याचे जावई आहेत कि काय? अशा प्रश्न पडतो आहे. जनतेच्या पैशाचा अपव्यय चुराडा करणार्या व वरिष्ठांशी आर्थिक हातमिळवणी करून भ्रष्टाचारांचे कुरण माजवत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.त्यामुळे उपविभागीय अभियंता सर्वगोड यांच्या गैरकारभाराची चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केली आहे.

Post a Comment

 
Top