0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मंत्रिमंडळ विस्तारावरून आमच्यात मतभेद नाहीत. योग्यवेळी तारीख ठरेल असं सांगितलं होतं. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री तारीख जाहीर करतील. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल. काँग्रेसची यादी आली नाही. त्यांची चर्चा दिल्लीत होते. ती यादी आली की मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. तसेच पुन्हा एकदा कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भाजपला टोला लगावला आहे.
कर्ज माफी सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे, विरोधात बसल्यामुळे भाजपा नेते काहीही बोलत आहेत. सर्व प्रक्रिया ऑनलाइन केल्याने पारदर्शी होत, अस कोणी सांगितलं? असा सवाल करत ते म्हणाले की, सगळ्यात सुलभ, सहजरित्या कर्जमाफी मिळणार त्यामुळे भाजपला वाईट वाटत असेल. कोणीही मारहाण करण चुकीचं पण सोशल मीडियावर कोणत्या स्तरावर ट्रोल करायचं, खालच्या स्तरावर मत व्यक्त केली जातात हे थांबलं पाहिजे. अस मत त्यांनी यावेळी मांडलं.  ऑनलाईन कर्जमाफी नसल्याने भ्रष्टाचार अधिक होईल, असा आरोप भाजप नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी केला होता. यावर जयंत पाटील म्हणाले कि, विरोधात बसल्यावर त्यांना असं बोलणं क्रमप्राप्त आहे. 

Post a comment

 
Top