0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि सोबतीला शिवसेना असं वेगळ्या समीकरणाचं सरकार सत्तेवर आलं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची विचारसरणी जवळपास एकच आहे. पण, यात शिवसेना हा हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष आहे. त्यामुळं हे राजकीय समीकरण जुळलंच कसं? असं कोडं सगळ्यांना पडलं आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाताना हिंदुत्वाचं काय? असाही एक प्रश्न सगळ्यांना पडलाय. त्यावर आज खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात विधानसभेत खुलासा केला आहे. तसेच पहिले अधिवेशन संपल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,एक ते दोन दिवसात खातेवाटप करणार आहे. तसेच आरे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले असल्याचीही माहिती यावेळी त्यांनी दिली. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेडच्या बांधकामास स्थगिती देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. विकास आणि पर्यावरण हे दोन्हीही सोबत असले पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले

Post a Comment

 
Top