0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – रत्नागिरी |
निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेला प्रदेश म्हणजे कोकण… कोकणातील सौंदर्य थंडीतच अधिक खुलतं. सध्या कोकणात हुडहुडी भरणाऱ्या थंडीची चाहूल दिली आहे. उशिरा का होईना पण कोकणात दाट धुकं पडायला लागलं आहे. पण यासाठी डिसेंबरची वाट पहावी लागली आहे. पण याच थंडीची चाहुलीने सध्या कोकणातला निसर्ग खुलला आहे.कोकणातल्या घाट रस्त्यात धुकं पहायला मिळतं आहे. त्यामुळेच कोकणात सध्या वळणावळाच्या घाटातले रस्ते दाट धुक्याची चादर ओढली आहे.अगदी सकाळी दहा वाजेपर्यंत कोकणातल्या निवळी घाटातलं धुकं हलता हलत नाही. कोकणाच्या सौंदर्यात भर पडणाऱ्या या गुलाबी थंडीची निवळी घाटातली सफर प्रत्येकाला बघण्याची इच्छा होते. हा थंडी आणि सौदर्याचा अनोखा नजराणा डोळ्यात साठवायला बाहेर  पडतात.थोडा उशिरा का होईना पण कोकणात अनेक ठिकाणचा पार खाली यायला सुरुवात झाली आहे. कोकणात सुद्धा सध्या बोचऱ्या थंडीनं दस्तक दिली आहे. गेल्या चार सहा दिवसापासून पडणाऱ्या थंडीनं अनेकांना गार केलं आहे. पण या थंडीनं कोकणात येणाऱ्या घाटातल्या रत्याचं सौदर्य खुलून गेला आहे. रत्नागिरीजवळचा निवळी घाट हा दाट धुक्याच्या चादर ओढल्याप्रमाणे सध्या या ठिकाणी धुकं पाहायला मिळत आहे.

Post a Comment

 
Top