0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – औरंगाबाद |
शहरातील एन-वन परिसरामध्ये आज पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्याला फिरताना पाहून सर्वच हादरुन गेले. एन-वन परिसरात एकच खळबळ उडाली आहे. येथील नागरिकांनी तात्काळ वन विभाग आणि पोलिसांना याविषयी माहिती दिली आहे. पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. काळ गणपती मंदिरा मागील गार्डनमध्ये सकाळी नऊपर्यंत युद्ध पातळीवर बिबट्याचा शोध सुरू केला जात होता. 

Post a comment

 
Top