0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मध्यरात्रीच्या सुमारास ईरटिका कारचाअडोशी गावाजवळ भीषण अपघात झाला. पुण्याहुन मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव वेगात असणाऱ्या कार चालकाला डुलकी लागली. यामुळे कार एक्सप्रेस वेवर सुरक्षेकरिता लावण्यात आलेल्या लोखंडी रेलींगमध्ये घुसली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघताता दोन लहान मुलांनाही गंभीर दुखापत झाली आहे. एकुण दोन लहान मुले तसेच एका महीलेला अशा तिघा जखमींना उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातातून कार चालक किरन गुरसुंड हा आश्चर्यकारक रित्या बचावला. पुण्याहुन धार्मिक विधी अटोपून मुंबई अंधेरीकडे येण्यासाठी ओला कारची बुकींग करुन मोतीवाले कुटूंबीय निघाले होते. पंरतू 38 किलोमीटर अडोशी गावाजवळ त्यांच्या कारचा दुर्देवी अपघात झाला. 

Post a comment

 
Top