0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड शहर तसेच तालुक्यात मोठया प्रमाणात विजचोरी केली जात असुन विद्युत महामंडळाचे उपअभियंता सुरेश सुराडकर यांच्या पंचकांनी टाकलेल्या धाडीत शेकडो चोरीचे आकडे टाकणार्‍या वायरी जप्त करून कारवार्इ सुरू केल्याने सुराडकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.अत्यंत पारदर्शक हुशार अभियंता म्हणुन सुराडकर याचं नावलौकिक आहे.गेल्या दोन वर्षे मुरबाड शहरातील तसेच तालुक्यातील विजेचा लपंडाव विज चोरीने नागरिक हैराण झाले होते अंधारात नागरिकाना राहावं लागत असे निकृष्ट कामे केली जात अशा वाढत्या तक्रारीने तात्कालीन उपअभियंता यांची बदली झाली त्याजागी सुरेश सुराडकर यांची मुरबाडला नियुक्ती झाली आहे. नियुक्ती होताच मुरबाड शहर आणि ग्रामीण भागाच्या विद्युत पुरवठा सुरळीत झाला असुन विज चोरीला आळा घालण्याचे काम सुरू आहे.गेल्या तीन वर्षापुर्वी सुराडकर मुरबाडला होते त्यांच्या कालावधीत विद्युत महामंडळाचा कारभार पारदर्शक चांगला होता विजचोरी कमी होती उत्पनात वाढ झाली होती परंन्तु मधल्या दोन वर्षात 9 कोटीची थकबाकी आणि कोटी रूपायाची विजचोरी झाली आहे.कुजलेल्या तारा पोल साहित्य बदलण्याचे काम सुरू असुन अवैधरित्या विज वापरणार्‍यावर कारवार्इ केली जात आहे.चोरटयामुळे प्रामाणिक विजबिल भरणार्‍याना अंधारात राहावे लागते.मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीने अवैध इमारत असलेल्या 72 गाल्याना विज पुरवठा केला होता त्याची विज चोरीपकडली त्याना आडीच लाखाचा दंड झाला तरीही अवैध व्यापारी इमारतीत विद्युत पुरवठा सुरूच आहे.अशा चोरटया विज चोरीवर तात्काळ कारवार्इ करणे गरजेचे आहे.याकडे सुराडकर यांनी लक्ष वेधुन कारवार्इ करावी अशी अपेक्षा नागरिकानी केली आहे.एका मिटर वरून दोनशे फुटावर व्यापारी विज देवुन कृषी उत्पन्न बाजार समिती विजचोरी करत आहे याकडे लक्ष वेधने गरजेचे आहे.

Post a Comment

 
Top