0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – दिल्ली  |
कला साधनेतून वारली या आदिवासींच्या समृध्द कलेला कॅनवासवर चित्रित करणारे अहमदनगर येथील चित्रकार अरविंद कुडिया यांच्या वारली चित्रांचे अनोखे प्रदर्शन राजधानी दिल्लीत देश-विदेशातील कला रसिकांचे आकर्षण ठरत आहे.
पालघर, मुरबाड, जव्हार भागातील आदिवासींच्या समृध्द सांस्कृतिक वैभवाचा गेल्या 22 वर्षांपासून अभ्यास करणारे अरविंद कुडिया यांनी प्रथमच वारली या लहान आकारातील चित्रांसाठी प्रसिध्द असलेल्या कलेला भव्य आकारात प्रदर्शित करण्याचा अनोखा प्रयोग केला आहे. येथील मंडीहाऊस परिसरात स्थित ललित कला अकादमीच्या कला दालनात ही प्रदर्शनी लावण्यात आली असून 6X6 ते 7X17 फूट अशा भव्य आकारातील तब्बल 12 चित्र याठिकाणी प्रदर्शन व विक्रीसाठी आहेत.

Post a comment

 
Top