0
BY - सुनिल सकट,युवा महाराष्ट्र लाइव – अहमदनगर |
क्रांतिगुरु लहुजी साळवे स्मारक समिती च्या वतीने क्रांतिगुरु लहुजी साळवे स्मारक समिती महाराष्ट्र राज्य कोर कमिटी संपर्क प्रमुख नानाभाऊ आप्पा वाल्हेकर यांनी आष्टी तालुक्यामध्ये प्रथम देवीगव्हान या गावी क्रांतिसूर्य वीर  लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी केली.ह्या कार्यक्रममध्ये मातंग समाजाच्या मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी समाजाचे नेते व कार्यकर्ते उपस्तिती होते त्यामध्ये क्रांतिगुरु लहुजी साळवे स्मारक समितीचे कोर कमिटी प्रभारी अध्यक्ष साहेबराव यादवराव पाचरने, जेष्ठ कवी लांडगे सर, आष्टी नगरसेवक ज्ञानदेव वाल्हेकर,तसेच आष्टा ग्रामपंचायत सदस्य दादा कांबळे इत्यादि हजर हॊते. 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबराव यादवराव पाचरने हे होते.प्रास्ताविक भाषणामध्ये नानाभाऊ वाल्हेकर यांनी लहुजी साळवे याच्या बद्दल समाज प्रबोधक विचार मांडले व देशातील तरुणाई वाचवायची असेल तर लहुजींच्या विचाराची गरज आहे व शिक्षणातूनच समाजाचा विकास होऊ शकतो. हा विचार मांडला. देशातील तरुनांनी व्यसनापासून दूर राहायला पाहिजे हि विनंती केली.तसेच लांडगे सरांनीहि मोलाचे मार्गदर्शन केले त्यामध्ये लहुजी वस्ताद साळवे यांना जाणीवपूर्वक अंधारात ठेवण्यात आले लहुजी वस्तादच स्वातंत्राच्या क्रांतीचे महानायक आहेत लहुजी साळवे जन्माला आले नसते तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते असे अनमोल विचार मांडले. असा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Post a comment

 
Top