0
BY - स्वप्निल डावरे,युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
कल्याणमध्ये दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खोकला आणि सर्दीने त्रस्त असलेल्या शहझीन या दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या मृत्यूची घटना कल्याणच्या श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये घडली. मुलाला बरं वाटत नसल्याने नोमान काजी यांनी श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये मुलाला आणलं. डॉक्टरने तपासून औषध दिलं मात्र घरी घेऊन जात असताना रस्त्यातच मुलाचा मृत्यू झाला.याबाबत मुलाच्या नातेवाईकांनी डॉक्टरवर निष्काळजीपणाचा आरोप करत मारहाण केली. डॉक्टरवर कारवाईची मागणी केली जात असून हॉस्पिटल प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले आहेत. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Post a comment

 
Top