0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
महाराष्ट्रातील ठाणे जिल्हयाच्या मुरबाड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक,सचिव,क्लार्क यांनी खोटे दस्तएैवज तयार करून 72 व्यापारी गाल्यांची अवैध इमारत उभी केली होती त्यातील व्यापारी गाळे आपल्या मर्जीनुसार विक्री करून कोटी रूपयांचा अपहार केल्याची तक्रार विकासमंच ट्रस्टच्या अध्यक्षा सौ.ज्योतीतार्इ नामदेव शेलार यांनी देशाचे पंतप्रधान,राष्ट्रपती यांचेकडे केली होती.
          भाजपाच्या कालावधीत अनेक तक्रारी पोर्टलवर प्रत्यक्षात राज्यसरकार व जिल्हाधिकारी,तहसिलदार,पणन महामंडळाकडे केल्या होत्या त्याकडे संगणमताने दुर्लक्ष करून महाराष्ट्रातील संबंधित विभागांनी गैरव्यवहाराला पाठिशी घातले होते.या भ्रष्टाराजवटीला कंटाळून ज्योतीतार्इ शेलार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मा.राष्ट्रपती यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती त्या मागणीची दखल पंतप्रधान कार्यालयाकडून घेऊन या प्रकरणाची गांभिर्याने चौकशी करून कारवार्इचे आदेश लेखी पत्राद्वारे महाराष्ट्राचे चिफ सेक्रेटरी यांना दिले आहेत.
          मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीला महसुल विभागाने 2 एकर 27 गुंठे जागा आहे त्याठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन तीन मजली इमारती उभ्या करून त्यातही अवैध गाले बांधकाम करून त्याची विक्री केली आहे.सन 2011-12 वर्षात पणन महामंडळाची दोन टप्प्यांणा सर्व्हे नं 153 चा 3 यामध्ये परवानगी मिळाली मात्र,दंडेलशाहीने महसुल खात्याच्या नविन गावठाण सर्व्हे नं.152 (अ) मोकळया जागेत 72 गाळयांची अनधिकृत इमारत उभी करून गाळयांची विक्री केली आहे.या इमारतीला नगररचना,ग्रामपंचायत,नगरपंचायत यांची बांधकाम परवानगी नाही ही बांधकामे नियमित करण्यासाठी मुरबाड नगरपंचायतीकडे दंड भरून अवैध बांधकामे नियमित करण्याचा काम सुरू आहे.शासनाची जागा,मालमत्ता विक्री करणार्‍यावर शासनाने फौजदारी गुन्हे दाखल करून इमारत सील करावी अशी मागणी सौ.ज्योतीतार्इ शेलार यांनी केली आहे.


Post a comment

 
Top