0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड नगरपंचायत हद्दीतील डाकबंगला येथिल मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पीटल बाजुला एका जागेवर कोणत्याही प्रकारे मुरबाड नगरपंचायत तसेच मुरबाड तहसिलदार यांचे महसुल अंतर्गत माती उत्खनन करण्याची कोणतीही परवानगी घेण्यात आली नसताना बेकायदेशीरपणे माती उत्खनन करून बांधकाम करण्यात येत असल्याची तलाठी सर्कल,मंडळ अधिकारी यांना माहिती मिळाली.तेव्हा घटनास्थळी पाहणी करून सदरहू काम बंद करण्याचे सांगण्यात आले व पंचनामा करण्यात आला.तेव्हा हा निधी खासदारकीतून आणण्यात आला असल्याचे एका व्यक्तीने तलाठयांना सांगितले,तेव्हा तलाठयांनी आम्ही आपले काम करता असल्याचे सांगून आपली प्रशासक भुमिका चोख राखली.तेव्हा सदरहू हे काम करतांना कोणकोणत्या परवानगी घेतल्या गेल्या सदरचे कागदपत्रे दाखवा असेही तलाठी यांनी विचारले असता कोणत्याही प्रकारे कागद सादर करण्यात आले नसून सदरहू दंडात्मक कारवार्इ करण्यात आले असल्याचे समजते.सदर जागा कोणाची आणि बांधका करते कोण त्याला खासदारांचा निधी कोणत्या आधारे दिला मग जागेचा भुमिअभिलेखाची मोजणी नकाशा अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे अद्दयापही मिळाली नसल्याने बेकायदेशीर बांधकाम करतांना मुरबाड नगरपंचायतची हद्दीतील वार्डाच्या नगरसेवकाला कसे कळाले नाही आणि जर कळाले असूनही शासनाला सहकार्य करण्याएैवजी अनधिकृत विषयामध्ये सहाकार्य का केले अशा नगरसेवकाला तात्काळ निलंबित करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे.सदर बांधकामाच्या दंडाचे गणित वजा बाकी शासन तफ्तरी होत असतानाही आपल्या मनमानीने व शासनाच्या नियमांना धाब्यावर मारून कायद्दयाची एैसी कि तैसी करून बांधकामे चालू ठेवली असल्याचे निदर्शनास आले आहे.मुरबाड नगरपंचायत सि.ओ यांच्या दुर्लक्षतेने नगरसेवक फैतारला आणि महसुल दफ्तरी तलाठी सर्कल यांनी चोखरित्या काम करूनही कारवार्इ शुन्यच राहिली आहे.कॉन्ट्रॅक्टदार जनू या जागेचा मालक बनला असून शासनाला गाजर दाखवत कॉलमसाठी सळया टाकण्याचा काम करत असल्याचे समोर असताना मुरबाड तहसिलदारांनी व मुरबाड नगरपंचायत सि.ओ यांनी बघ्याची भुमिका घेतली आहे.आता शासन दंडात्मक कारवार्इ करून नियमांना धाब्यावर मारणार्‍या सोडेल की भुमिअभिलेख मार्फत मोजणी  करून जागा कोणाची व अनधिकृतीवर हातोथा मारून काम बंद करेल त्याचबरोबर ज्या वार्डात हा प्रकार घडत आहे तेथिल नगरसेवकाला माहिती असतानाही निलंबित करेल याकडे मुरबाडच्या नागरिकांचे लक्ष लागून आहे.
Post a Comment

 
Top