0
BY - मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे |
भातसा नदीच्या पाण्याची पातळी वाढविण्याकरिता बसविण्यात आलेल्या न्यूमॅटिक गेट सिस्टीमची दुरुस्ती दिनांक 3 डिसेंबर 2019 ते 9 डिसेंबर 2019 या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने  करण्यात येणार असून या कालावधीत ठाणे शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.  ठाणे महानगरपालिका व बृहन्मुंबई महानगरपालिका यांना पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथे भातसा नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यावर नदीच्या पाण्याची पातळी वाढविण्याकरिता बसविण्यात आलेल्या न्यूमॅटिक गेट सिस्टीमची दुरुस्ती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे.
 न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या  दुरुस्तीचे काम करण्यासाठी नदीच्या पाण्याची पातळी कमी करण्यात येणार असून या कालावधीत पिसे येथील उदंचन केंद्रात पाण्याची पातळी खालावली जाणार आहे. तरी सदर कालावधीत ठाणे महानगरपालिकेला कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार असल्याने शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नौपाडा-कोपरी, टेकडी बंगला, किसननगर व हाजुरी या परिसरात होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Post a comment

 
Top