0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्यात खेडेगावापासुन शहरापर्यंत मोठया उत्सहाने दत्तजयंती साजरी होत आहे.ठाणे जिल्हयातील कल्याण उंबर्डे येथील सदगुरू लक्ष्मण महाराज धोडपाडा यांच्या अर्शिवादाने सालाबाद प्रमाणे जय जवान कला मंडळ उंबर्डे यांनी 9 डिसेंबर ते 11 डिसेंबर तीन दिवस प्रार्थना आरती हरिपाठ भजन किर्तन महाप्रसाद असे कार्यक्रमाचे आयोजन केल.तसेच टिटवाळा येथील दत्तभक्त योगाचार्य सुदाम धर्मा पाटील यानीही सालाबाद प्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. टिटवाळा येथील दत्तभक्त वसंत मुकूंद भगत यांच्या घरी भव्य दत्तजयंती उत्सव साजरा होताना शेकडो भक्तानी रांग लावली पुजापाठ भोजन हरिपाठ होमहवन महाप्रसाद असे कार्यक्रमाचे नियोजन केले.मुरबाड शहर मुरबाड तालुक्यात तसेच शहापुर भिवंडी पडघा बदलापुर आंबरनाथ उल्हासनगर वाडा कल्याण परिसरातील गांवात तसेच शहरात दत्तजयंती सोहळा विविध धार्मिक परमार्थिक कार्यक्रमाने साजरा करण्यास भक्तानी सहभाग घेतला.

Post a Comment

 
Top