0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – दिल्ली |
दिल्लीमध्ये पुन्हा एकदा आग लागली आहे. यावेळी दिल्लीच्या मुण्डका परिसरात एका लाकडाच्या गोदामाला आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या 21 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. आगीमध्ये काही लोक अडकल्याची शक्यता आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या अनाजमंडीलमध्ये भीषण आग लागली होती. यामध्ये 43 लोकांना जीव गमवावा लागला होता. स्कूल बॅग आणि पॅकेजिंग मटेरियल बनवणाऱ्या फॅक्ट्रीमध्ये ही आग लागली होती. यामध्ये जवळपास 65 लोक जखमी झाल्याचे वृत्त होते. 

Post a Comment

 
Top