0
BY,कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव्ह - वाई
मातृभुमी वाई येथे भगवा कट्टा प्रतिष्ठान येथील कार्यक्रमात स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील कोंडोजी फार्जन्द यांची भुमिका साकारणारे श्री.आनंद काळे यांच्या शुभहस्ते नामवंत असे शिवव्याख्याते मा.राम यादव यांचा सत्कार करुन सन्मान करण्यात आला.अंगावर शहारे आणि डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्भिड अशा कार्यप्रणाली प्रतिमेची आपल्या व्याख्यानमालिकेतून इतिहासाची माहिती व महाराजांची किर्ती बेभान असल्याचे  अभिमानाने जेव्हा ते सांगतात तेव्हा दगडालाही पाझर फुटेल अशा व्याख्यानमालिकेचे महाराष्ट्र नामवंत व्याख्यानकर्ते श्री.राम यादव यांनी वाई येथील शिवभक्तांना धडाडली सातारी शिवतोफ  मध्ये छत्रपती शिवाजी शिवराय आणि भगवा या विषयावर व्याख्यान करत हा झंझावत वेगवान असल्याचे त्यांनी आपल्या व्याख्यानमालिकेत सांगितले.

Post a comment

 
Top