0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
बदत्या हवामानामुळे राज्यात अनेक ठिकाणी टायफार्इड डेंग्यु सर्दी ताप अशा साथीच्या आजाराने थैमान घातला आहे.याकडे शासनाने लक्ष वेधुन आरोग्य पथकामार्फत डास फवारणी पाणी शुध्दीकरण औषधौपचार करावे शासकीय रूग्णालयात औषधाचा साठा करून दयावा गांवात शहरात वैद्यकीय पथक नेमावीत अशी मांगणी जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यात डेंग्युचे रूग्ण आढळले असुन सर्दी ताप डोकं टायफार्इड असे हजारो रूग्णं साथीच्या आजाराने त्रस्त झाले आहेत.शासकीय रूग्णालयात टायफार्इड वरील औषधे इंजेक्शने नसल्याने रूग्णांना बाहेरून आणावे लागतात त्याचा खाजगी रूग्णालय फायदा घेत आहेत तसेच कल्याण भिवंडी शहापुर सह संपुर्ण ठाणे जिल्हयात साथीच्या रोगानी थैमान घातला आहे.याकडे संबधित प्रशासकीय अधिकारी यांचे दुर्लक्ष झाले आहे.तसेच जुन्नर येथील अनेक शाळकरी विद्यार्थी विद्यार्थीनी नागरिक महिला यानाही टायफार्इड डेंग्युच्या साथीने हैराण केले आहे.रूग्णांची खाजगी रूग्णांलयात उपचार सुरू असुन शासनाने आरोग्य पथकाना पाचारण करावे अशी मांगणी जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी केली आहे.

Post a comment

 
Top