0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – पालघर |
जिल्ह्यातील डहाणू, तलासरी येथे शनिवारी पहाटे भूकंपाचे धक्के बसले आहे. पहाटे 5.22 वाजता भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतेही नुकसान झालेले नाही. पालघरमध्ये वारंवार भूकंपाचे धक्के बसत असतात.याविषयी मुख्य अधिकारी विवेकानंद कदम म्हणाले की, जिल्ह्यामध्ये पहाटे पाचच्या सुमारास 4.8 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. तसेच सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पालघर जिल्ह्यात यापूर्वीही अनेकदा अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Post a Comment

 
Top