0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
विलेपार्ले स्टेशन परिसरातील इमारतीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. इमारतीत काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बचावकार्य सुरु आहे. ही आग लाभश्री विला इमारतीच्या 13 व्या मजल्यावर लागली आहे, विलेपार्लेच्या बजाज रोडवरील घटना, अग्निशमन दलाच्या 7ते 8 गाड्या दाखल झाल्या आहेत, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.  दरम्यान, इमारतीत काही जण अडकले होते. मात्र त्यांची सुटका करण्यात आली. तसेच, या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Post a comment

 
Top