0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नागपूर |
येथील सिव्हील लाईन्स भागात असलेल्या हैद्राबाद हाऊसमध्ये उभारण्यात आलेल्या वैद्यकीय सहायता निधी कक्षाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी येथील अधिकारी-कर्मचारी यांच्याशी चर्चा करुन सर्व आवश्यक सुविधांबाबत विचारपूस केली. तसेच या कक्षासाठी अजून आवश्यक असणाऱ्या बाबींसंदर्भात विचारणा केली. वैद्यकीय सहायता कक्षाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विशेष कार्य अधिकारी सुधीर नाईक उपस्थित होते.

Post a comment

 
Top