0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जोमानेच कामाला लागले आहेत. नुकतंच ठाकरे सरकारने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अजून एक दणका दिला आहे. पालिका क्षेत्रात फडणवीस सरकारच्या काळात कामांना स्थगिती देण्यात आली  आहे. ज्या कामांचा शुभारंभ झाला नसेल अशा कामांना स्थगिती देण्याचा निर्णय नगरविकास खात्याने घेतला आहे. यामुळे फडणवीसांना चांगलाच दणका मिळाल्याचे बोललं जात आहे.
नगरविकास खात्याने घेतलेल्या निर्णयानुसार, राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांना विकास कामांकरिता विविध योजनेंतर्गत विशेष अनुदान देण्यात येते. यात महापालिका पायाभूत सुविधा, महापालिका हद्दवाढ, नवीन नगरपालिका, नगरपालिका हद्दवाढ, नगरपरिषद यात्रास्थळ , नगरपरिषद वैशिष्ट्यपूर्ण यांसह इतर योजनेतंर्गत 2019-20 आर्थिक वर्षात निधी वितरीत करण्यात आला आहे.

Post a Comment

 
Top