0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
मराठी चित्रपट सृष्टीचे नटसम्राट म्हणून ओळखले जाणारे श्रीराम लागू यांचे दुखद निधन झाले आहे. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीराम लागू यांच्या दीनानाथ रूग्णालयात उपचार सुरू होते. याच रूग्णालयात त्य़ांनी अखेरचा श्वास घेतला. गुरूवारी लागू यांच्या पार्थिवावर अंतसंस्कार करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती फारशी चांगली नव्हती. ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘पिंजरा’ यासारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होतं. ‘नटसम्राट’ या नाटकातली त्यांची अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका विशेष गाजली. 

Post a Comment

 
Top