0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – बीड  |
पूर्णा- हैद्राबाद रेल्वेत स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटात एक तरुण गंभीर झाला आहे. परळी स्टेशनवर रेल्वे उभी होती त्यावेळी ही घटना घडली. सय्यद अक्रम असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे.
सय्यद अक्रम हा तरुण पूर्णा- हैद्राबाद रेल्वेत त्याच्या कुटुंबासमवेत चढला होता. ही रेल्वे परळी रेल्वे स्थानकात आली. त्यावेळी रेल्वेचे इंजिन बदलण्याचे काम सुरू असताना रेल्वे डब्यातील शौचालयात स्फोट झाल्याचा आवाज आल्याने प्रवाशांत मोठी धावपळ उडाली.काही प्रवाशांनी शौचालयाचा दरवाजा उघडला असता त्यात एक तरुण रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. स्फोट नेमका कशाचा झाला हे अद्याप अस्पष्ट आहे.

Post a comment

 
Top