0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नागपूर |
वित्त व नियोजन मंत्री जयंत पाटील आणि  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुयोग येथे भेट देऊन पत्रकारांशी वार्तालाप केला.विधिमंडळ सभागृहाचे वृत्तांकन करण्यासाठी मुंबईवरुन आलेले पत्रकार सुयोग येथे वास्तव्यास असून वित्तमंत्री व महसूलमंत्री यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जयंत पाटील यांनी राज्याची आर्थिक स्थिती, महसुली तूट, राजकोषिय तूट, जीएसटीचा राज्याला मिळालेला निधी, केंद्राकडे बाकी असलेला निधी, राज्यातील विकासात्मक कामांचा आढावा आदी  बाबी औपचारिकरित्या पत्रकारांसमोर मांडल्या. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना दोन्ही मंत्र्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

Post a comment

 
Top