0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
पोलिस भरतीची लेखी परीक्षा ‘महापोर्टल’च्या माध्यमातून न होता, मैदानी चाचणीनंतर ऑफलाईन घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सुप्रिया सुळेंनी पत्र लिहून (Supriya Sule letter to CM) मुख्यमंत्र्यांना पोलिस भरती प्रक्रियेत सुधारणेची मागणी केली.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यात पोलिसांचे मोठे योगदान असते. यासाठी ते शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे. मागील सरकारने मैदानी चाचणीपेक्षा लेखी परीक्षेचं महत्त्व वाढवून भरती प्रक्रियेत अन्यायकारक बदल केला. याचा सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातील उमेदवारांवर प्रतिकूल परिणाम झाला, असा दावा सुप्रिया सुळेंनी पत्रात केला आहे.

Post a comment

 
Top