0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करण्यात येणार आहे. तसेच भूमिपुत्रांना नोकरीत आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल आणि राज्यातील जनतेला 10 रुपयांत जेवण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असं आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज त्यांच्या अभिभाषणातून दिलं.
माझे सरकार शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून आवश्यक ते पाऊल उचलेल. महात्म्यांच्या आदर्शावर राज्य वाटचाल करेल. वाढती बेरोजगारी ही शासनासमोरील मोठी समस्या आहे. विकासकामे करण्यासाठी सरकार बांधील असेल. माझे शासन हे शेतकरी, कष्टकरी जनतेसाठी काम करेल. सीमा भागातील जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करु.

Post a comment

 
Top