0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
केरळ विधान मंडळाच्या पर्यावरण समितीने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची विधानभवनात भेट घेऊन पर्यावरणासंदर्भात चर्चा केली. यावेळी समितीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार मुल्याकरा रत्नाकरन व त्यांचे सहकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील प्लास्टिक बंदी, कोस्टल भागातील पर्यावरण समस्या, पूर परिस्थितीनंतरची पर्यावरण समस्या, जैव वैद्यकीय कचरा आदींबाबत सविस्तर चर्चा झाली.त्याचप्रमाणे केरळमधील पर्यटन क्षेत्र व त्याठिकाणी असलेली पर्यावरण समस्या संदर्भातही चर्चा करण्यात आली. सदरील समिती महाराष्ट्रात मुंबई, औरंगाबाद, वर्धा तसेच गुजरात व राजस्थान राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती समितीच्या अध्यक्षांनी दिली. विधानमंडळाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत यांनी महाराष्ट्रातील विधानमंडळाच्या कामकाजाची व विविध समित्यांची माहिती उपस्थितांना दिली. या समितीमध्ये आमदार सर्वश्री के.बाबू, ओ.आर.केलू, पी.टी.ए.रहीम तसेच अधिकारी वर्गाचा समावेश आहे. सुरुवातीस विधासनभा अध्यक्षांनी समिती अध्यक्षांना पुष्पगुच्छ देऊन महाराष्ट्रात सर्वांचे स्वागत केले. या बैठकीस विधिमंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. 


Post a comment

 
Top