0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – दिल्ली |
नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधात रविवारी दिल्लीतील जामिया विद्यापीठाच्या परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली. यानंतर येथे प्रचंड हिंसाचार उफाळला होता. या पार्श्वभूमीवर रात्री उशीरा निदर्शकांना ताब्यात घेण्यात आले होदते. आता जवळपास 50 निदर्शकांना सोमवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी सुटका केली आहे. निदर्शकांनी रविवारी सायंकाळी अनेक बस पेटवल्या होत्या. धुमश्चक्रीमध्ये सहा पोलीस, दोन अग्निशामक जवान आणि काही विद्यार्थ्यांसह जवळपास 10 जण जखमी झाले होते. यासोबतच हिंसाचारामुळे मेट्रो रेल्वेची पाच स्थानकेही बंद करण्यात आली होती. विद्यापीठाच्या आवारामधून पोलिसांवर दगडफेक केली जात होती. याच कारणांमुळे निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुरांचा वापर करावा लागला.

Post a Comment

 
Top