0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नागपूर |
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात लिंगा गावात 5 वर्षीय चिमुकल्या मुलीवर अत्याचाराचे प्रयत्न केल्यानंतर तिची हत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी 32 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव संजय पुरी असे आहे. पोलिसांनी शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवानंतर आरोपी संजय विरुद्ध हत्ये सोबतच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून रक्षण करणाऱ्या पॉक्सो कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Post a Comment

 
Top