0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
हे सरकार 5-10 वर्ष नाही तर 50 वर्ष टिकेल असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्यतील सर्वसामाऩ्य जनतेचा आशिर्वाद माझ्या पाठीशी आहे. मला प्रशासनाच्या कामाचा अनुभव नसला तरी माझ्यात आत्मविश्वास आहे. राज्यतील सर्व जनतेच्या आशा, आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. ती पार पाडण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू असं मुख्यमंत्री म्हणाले. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशानासाठी त्यांचे नागपूर येथे आगमन झाले. यानंतर महाआघाडीच्या नेत्यांनी त्यांचा सत्कार केला, यावेळी ते बोलत होते.
ठाकरे म्हणाले, माझ्याकडे जनतेचे आशिर्वाद आहेत. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण हा संपूर्ण महाराष्ट्र एक आहे. महाराष्ट्राला देशाला अभिमान वाटेल असे सरकार, शासन आम्ही चालवू. जर आपण एकत्र आलो तर हे सरकार केवळ पाच वर्षेच नव्हे तर २५ वर्षेच काय ५० वर्षे आणि पिढ्यान पिढ्या कायम राहिलं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Post a comment

 
Top