0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – उल्हासनगर |
उल्हासनगर परिमंडळ 4 मध्ये खुलेआम मायकल उर्फ संतोष चा मटका जोरात सुरू असून, या अवैध उद्योगांकडे पोलिस यंत्रणेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. असे लक्षात येते. मटक्याच्या चिठ्ठ्या मिळूनही पोलीस कारवाई करत नाही.सध्या मायकल उर्फ संतोष हा मटका किंग उल्हासनगर परिमंडळ 4 च्या हद्दीत स्थानिक पोलिसाच्या भव्य पाठिंब्यानेच मटका राजरोसपणे चालवत आहे. असे बोलले जात आहे. त्यामुळे मटक्याच्या परंपरेने चालत आलेले ‘ओपन जेवू देईना आणि क्लोज झोपू देईना,’ हे वाक्य उल्हासनगर मध्ये सत्यात उतरले आहे.याबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता कोणतेही उत्तर दिले नाही.सदर मटका खेळणाऱ्यांत अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती असल्याने पैसा मिळविण्याच्या हेतूने ते चोऱ्यांसारखे गुन्हेही करतात. यामुळेच मटका थांबला की चोऱ्यांचे प्रकार आपोआप बंद होतील, असा 'ग्रामीण पोलीस' वृत्तपत्राचे संपादक खुशाल विसपुते यांचा विश्वास आहे.


Post a Comment

 
Top