0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
शेकडो वर्षाची परंपरा जोपासत पिरबाबा यात्रा मुरबाड तालुक्यातील उमरोली येथे भरली जाते.मोठया प्रमाणात नागरिकांची या यात्रेला गर्दी असते.ही यात्रा सतत 3 दिवस उमरोलीतील बळेगाव येथे भरली जाते या यात्रेचे आयोजन बळेगाव येथिल ग्रामपंचायत व्यवस्थापक मंडळ असून नागरिकांच्या नवसाला पावणारी ही पिरबाबा यात्रा आनंद घेऊन येते. दरवर्षी प्रमाणे यदांच्या वर्षीही ही यात्रा कालपासून सुरू झाली आहे.संपूर्ण जिल्हयासह महाराष्ट्रातून मोठया संख्येने भाविक या यात्रेला येत असतात.या यात्रेत कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा ताफा बंदोबस्तासाठी तैन्यातच असतो.या यात्रेत टोकावडे पोलिस ठाणे यांच्या अंतर्गत मोठया प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला.
गुरूवारी पिरबाबांची पालखी काढण्यात आली.गुरूवारी निरंकार उपवास करून पिर बाबांच्या चरणी नारळाची तळी फोडण्यात आली.यावेळी दर्शनासाठी आलेल्या मोठया प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.आज नृत्यांच्या अविष्काराचे कार्यक्रम पार पडले आहे.या पिरबाबा यात्रेत विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले असून खरेदी करतांनाही नागरिकांनी आपली उपस्थिती दाखविली होती.या यात्रेला शांततेत पार पाडण्यासाठी गावातील ग्रामस्थ,ग्रामपंचायत सदस्य,नागरिकांची एकता सज्ज असते.3 दिवसांच्या पिरबाबा यात्रेला हजारो संख्येने भाविक भक्तगण येत असतात.या यात्रेत तरूण वर्गांची मेहनत व सहकार्य या यात्रेला यशस्वी करत असून मोठया थाटामाटात या पिरबाबा यात्रेची शोभा संपूर्ण महाराष्ट्रात उमटली जात असून मुरबाडच्या या तालुक्यात देशातूनही भक्तगण दर्शनासाठी येत असल्याची माहिती उमरोली बळेगावातील ग्रामस्थांनी आमच्याशी बोलतांना सांगितली.Post a Comment

 
Top