0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकार अग्निपरीक्षेत पास झाले आहे. विश्वासदर्श ठराव 169 विरुद्ध 0 अशा मतांनी त्यांनी जिंकला आहे. आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होतो याकडे सर्वांच्या नजरा वळल्या आहेत. डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विस्तारात आणखी 14 मंत्री शपथ घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनसुार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरेंसोबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे आणि जेष्ठ नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, काँग्रेसकडून गटनेते बाळासाहेब थोरात आणि विदर्भातील नेते नितीन राऊत यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

Post a comment

 
Top