web-ads-yml-750x100

Breaking News

अपंगाच्या निधीवर ग्रामसेवकचा डल्ला ; 2 जानेवारीला पंचायत समिती,गटविकास अधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
अपंग व्यक्तीला शासकीय योजनेंतर्गत तीन चाकी सायकल खरेदी करण्यासाठी आठ महीन्यापूर्वी आलेला बारा हजार पाचशे रुपयांचा निधी ग्रामसेवकनी सायकल न घेता खर्च केला असल्याचा प्रकार टोकावडे ग्रामपंचायत मध्ये घडला असून सायकल नको पण या ग्रामसेवकला निलंबित करा या मागणीसाठी 2 जानेवारी हुतात्मादिनाच्या दिवसी मुरबाड पंचायत समिती,गटविकास अधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण अंदोलन करण्याचा निर्णय दिलीप साबळे या अपंग व्यक्तीने घेतला आहे.
             टोकावडे ग्रामपंचायत मधील रहीवासी दिलीप साबळे हे अपंग असल्याने त्यांना शासनाकडून सायकल मंजूर झाली होती .साबळे यांच्या बँक खात्यात जमा झालेला बारा हजार पाचशे रुपयांचा निधी काढण्यासाठी ग्रामसेवकनी को-या चेकवर सही घेऊन पैसे  काढले.परंतू आज पर्यंत मला सायकल ही नाही किंवा सायकल घेण्यासाठी पैसे नाहीत.मला चालता येत नसल्याने माझी पत्नी व मुलं ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे मारून धकले मात्र प्रतिसाद शुन्य.उलट आरेरावी शेवटी दोन जानेवारी रोजी हुतात्मा वीर भाई कोतवाल व हुतात्मा वीर हिराजी पाटील यांच्या बलीदान दिनाच्या दिवसी मुरबाड येथे गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार आहे.व एका चालू न शकणा-या अपंगाच्या निधीवर डल्ला मारणा-या ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल होत नाही.तोपर्यंत मी उपोषणावर ठाम राहणार आहे.

--------------------------
( टोकावडे ग्रामसेवक यांनी तेथील अपंग व्यक्ती दिलीप साबळे यांना सायकल साठी आलेला निधी हडप केला असल्याची तक्रार साबळे यांनी गटविकास अधिकारी मुरबाड यांच्या कडे केली आहे त्यासबंधी  मी 31 डिसेंबर रोजी प्रत्येक्ष टोकावडे येथे जाऊन दोन्ही बाजू जाणून घेऊन ग्रामसेवक दोषी असेल तर कारवाई केली जाईल.- गजानन सुरुशे विस्तार अधिकारी पंचायत समिती मुरबाड . )
--------------------------

( टोकावडे येथील अपंग व्यक्ती दिलीप साबळे यांची तक्रार मला मिळाली नाही . परंतू तक्रार मिळताच चौकशी करून कारवाई केली जाईल -  विश्वनाथ केळकर गटविकास अधिकारी मुरबाड . )

No comments