0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
भारतीय तटरक्षक दलाकडून अरबी समुद्रात अडकलेल्या 264 मच्छिमारांची सुटका करण्यात आली आहे. व्यापारी जहाजांच्या मदतीनं त्यांनी मच्छिमारांचे प्राण वाचवले. अचानक हवामान बिघडले यामुळे मच्छिमारांच्या 50 बोटी समुद्रामध्ये अडकल्या होत्या. याविषयीची माहिती तामिळनाडूमधील मच्छिमार संघटनांकडून भारतीय तटरक्षक दलाला मिळाली होती. यानंतर पश्चिम गोव्यापासून 250 नॉटिकल मैल अंतरावर मच्छिमारांच्या बोटी अडकलेल्या होत्या. तटरक्षक दलाकडून तातडीने मदतकार्य सुरू केले आणि सर्व मच्छिमारांची सुखरुप सुटका केली आहे.

Post a Comment

 
Top