0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
सोशल मीडियावर भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूविषयी वादग्रस्त पोस्ट शेअर करणे अभिनेत्री पायल रोहतगी हिला चांगलेच महागात पडले होते. वादग्रस्त पोस्ट केल्याबद्दल पायल हिला बुंदी पोलिसांनी 15 डिसेंबरला अटक करण्यात आली होती. काल न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला असून तिचा कारागृहातील मुक्काम लांबला होता. मात्र, आज न्यायालयाने प्रत्येकी 25 हजार रुपये अशा दोन जातमुचलक्यांवर पायलची सुटका केली आहे. मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीला राजस्थान पोलिसांनी अहमदाबाद येथून सकाळी अटक केली होती. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्याविरोधात पायलने आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यानंतर पोलिसांनी रविवारी सकाळी तिला अटक केली. स्वतः पायने तिला अटक केल्याचं ट्वीट करून सांगितलं होतं.

Post a Comment

 
Top