0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली  |
अमेरिकेची अंतराळ संशोधन संघटना National Aeronautics and Space Administration(नासा) ने चांद्रयान-2 च्या विक्रम लँडरविषयी मोठा खुलासा केला आहे. नासाने ट्विट करत माहिती दिली की, त्याचा लूनर रिकनॅसँस ऑर्बिटर (LRO) ने चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-2च्या विक्रम लँडरचा शोध लावला आहे.
नासाने दावा केला आहे की, चांद्रयान-2 च्या विक्रम लँडरचे अवशेष त्याच्या क्रॅश साइटपासून 750 मीटर दूर सापडले आहेत. विक्रम लँडरचे तीन अवशेष सापडले आहे. ते अवशेष 2x2 मीटर दूर मिळाले आहेत. नासाने रात्री जवळपास 1:30 वाजता विक्रम लँडरच्या इम्पॅक्ट साइडचा फोटो प्रसारित केला आहे. त्यांच्या ऑर्बिटरला विक्रम लँडरचे तीन तुकडे मिळाले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Post a Comment

 
Top